शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरला धडकून ड्रोन पडला; ग्रामस्थांची गर्दी, रात्रीच्या काळोखात ड्रोनच्या घिरट्या, ग्रामस्थ भयभीत

By सुदाम देशमुख | Updated: September 24, 2024 11:51 IST

याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना दिल्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांना पाचारण केले.

घारगाव ( अहमदनगर) : गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात काही उंचीवर चमकणाऱ्या ड्रोनच्या घिरट्यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. वाड्या वस्त्यांवर ड्रोन फिरत असल्याचे सोशल मीडिया, फोनच्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत. मात्र, सोमवारी दि. 23 रात्री तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत येठेवाडी ते शिरोळे मळा परिसरात एक ड्रोन विद्युत वितरणाच्या पारेषण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरला धडकून खाली पडला. हे घटना ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिली.

 याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना दिल्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांना पाचारण केले.        पठार भागातील खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, डोळासणे, घारगाव, कुरकुंडी, बोटा आदी गावांच्या परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांना दिसत होते. असे ड्रोन दिसताच जवळपासच्या गावांत संपर्क साधून नागरिक हे माहिती जाणून घेत होते. चार ते पाच ड्रोन फिरत असल्याचेही अनेकांनी पाहिले होते. याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिसांशी अनेकांनी संपर्कही साधला. कुरकुंडी येथे युवकांनी संबंधित ड्रोन कुठे उतरते, कोण उडवत आहे याचा तपास घेतला. मात्र, त्यांना कोणीही आढळून आले नाही. अशी परिस्थिती असताना सोमवारी रात्री येठेवाडी परिसरात ड्रोन टॉवरला धडकून कोसळल्याने एकच खळबळ उडाली. 

येठेवाडी येथील गट नंबर ५०८मध्ये ड्रोन कोसळला. आजूबाजूचे ग्रामस्थ कसला प्रकाश आहे हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना ड्रोन आढळून आला. ग्रामस्थांनी तलाठी युवराज सिंह जारवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ तहसीलदार धीरज मांजरे यांना कळविले. तहसीलदार मांजरे यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान, ग्रामस्थांनी पडलेल्या ड्रोनच्या भोवती गर्दी केली होती.