शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाने कमावलेली संपत्ती केली गावाला दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:25 IST

गावाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माधवबाबा शिंदे यांनी गावात मने जुळणारी वास्तु उभी करण्यासाठी स्वत:जवळील  १ लाख ३८ हजार रुपये दान केले.

यमन पुलाटे ।  
बाभळेश्वर : वयाच्या पाचव्या वर्षी दुर्गापूरला आईसोबत आलेला मुलगा गावात रमला. गावात राहून ग्रामदैवत आनंदबाबाची सेवा करत मोठा झाला. गावाने मला खूप दिले. मी गावाला काय देऊ? हा विचार कायमच मनात असायचा. गावाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी माधवबाबा शिंदे यांनी गावात मने जुळणारी वास्तु उभी करण्यासाठी स्वत:जवळील  १ लाख ३८ हजार रुपये दान केले. या दानातून गावात सांस्कृतिक भवन आणि भजन मंडप उभा राहणार आहे. 
आनंदबाबाजवळ तू रहा.  मंदिरात सेवा कर, असे सांगून माउली पाच वर्षाच्या मुलाला सोडून गेली. गावातील पुलाटे, मनकर, जाधव, रोकडे यांनी या मुलाला आधार दिला. आनंदबाबाचे भक्त चिमणबाबा आणि भक्तबाबा यांनी दिलेल्या प्रेमातून माधवबाबा घडत होते. मंदिरात सेवा करत माधवबाबा मोठे झाले.  चिमणबाबांने टेलरिंग शिकविले. जाधव परिवाराने गोदान केले. यातून उभ्या राहिलेल्या माधवबाबा यांनी बचत करत तब्बल १ लाख ३८ हजार रुपये जमवले. ती संपूर्ण रक्कम गावाला दान दिली. नुकतेच सरला बेटाचे मठाधिपती मंहत रामगिरी महाराज यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. 
बालपणापासून ज्या गावाने प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी दिली. माधवबाबा शिंदे यांनी १ लाख ३८ हजार  ही आपल्या आयुष्याची पुंजी संपूर्ण गावाला दान केली.  यातून भव्यदिव्य सभामंडप आणि कीर्तन मंडप उभा राहावा ही त्यांची अपेक्षा आहे.
गावाने प्रेम दिले. या प्रेमातून मी उभा राहिलो. गावातील जाधव, पुलाटे  परिवारांनी दिलेल्या प्रेमामुळे मी  उभा राहिलो. चिमणबाबांनी शिकवलेले टेलरिंगचे काम आणि यातून आलेला पैसा मी गावासाठी दिला. आज  ख-या अर्थाने गावासाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान मोठे आहे, असे माधवबाबा शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :rahaataराहाताLand Roverलँड रोव्हर