साई चरणी तीन दिवसांत ४ कोटी २६ लाखांचे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 21:50 IST2025-04-08T21:49:35+5:302025-04-08T21:50:49+5:30

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव ५ ते ७ एप्रिल या कालावधीत साजरा झाला.

donation of rs 4 crore 26 lakhs in three days at sai mandir shirdi | साई चरणी तीन दिवसांत ४ कोटी २६ लाखांचे दान

साई चरणी तीन दिवसांत ४ कोटी २६ लाखांचे दान

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी: साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव ५ ते ७ एप्रिल या कालावधीत साजरा झाला. या कालावधीत ४ कोटी २६ लाख ७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाली, अशी माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

...अशी आहे देणगी

रोख स्वरूपात १ कोटी ६७ लाख ८९ हजार ७८ रुपये दक्षिणापेटीत देणगी प्राप्त झाली आहे. देणगी काउंटरवर ७९ लाख ३८ हजार ८३० रुपये, पी. आर. ओ. सशुल्क पास देणगी ४७ लाख १६ हजार ८००, ऑनलाइन चेक डीडी, मनीऑर्डर, डेबिट क्रेडिट कार्ड, यूपीआय याद्वारे ०१ कोटी २४ लाख १५ हजार २१४, सोने ८३.३०० ग्रॅम रक्कम रुपये ६ लाख १५ हजार ७८२ व चांदी २०३०.४०० ग्रॅम रक्कम रुपये ०१ लाख, ३१ हजार ४७८ यांचा समावेश आहे.

श्रीराम नवमी उत्सव कालावधीत साधारणतः अडीच लाखांहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे १ लाख ६१ हजार ५२९ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. दर्शन रांगेत १ लाख ७६ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत ३ लाख ६३ हजार ७४ लाडूप्रसाद पाकिटांची विक्री झाली.

या माध्यमातून ७२ लाख ६१ हजार ४८० रुपये प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवासव्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवासव्यवस्थेचा लाभ घेतला, तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागांतून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवासव्यवस्थेचा लाभ घेतला, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितले.
 

Web Title: donation of rs 4 crore 26 lakhs in three days at sai mandir shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.