विकासकामांबाबत भेदभाव करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:00+5:302021-02-05T06:29:00+5:30

कानडे म्हणाले, या भागातील अनेक रस्त्यांची कामे मी मार्गी लावली आहेत. मुसळवाडी बंधाऱ्याच्या कामासह म्हसोबा परिसरामध्ये तीर्थक्षेत्र ...

Does not discriminate against development work | विकासकामांबाबत भेदभाव करत नाही

विकासकामांबाबत भेदभाव करत नाही

कानडे म्हणाले, या भागातील अनेक रस्त्यांची कामे मी मार्गी लावली आहेत. मुसळवाडी बंधाऱ्याच्या कामासह म्हसोबा परिसरामध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुशोभीकरण करण्यात येणार आहे. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला जनतेने निवडून देऊन आमदार केले. सर्वप्रथम जेथे कामाची अधिक दुर्दशा झालेली आहे तेथील विकासकामांना महत्त्व देऊन तेथील विकासकामे हे आधी केले. कोरोनाच्या काळामध्ये आपला संपर्क होऊ शकला नाही. यापुढे आता अधिकाधिक संपर्कात राहून जनतेची कामे करणार आहे. आम्हीदेखील शेतकऱ्यांची मुले आहोत, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. वीजबिलातील ६३ टक्के खर्च हा तेथील पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपणदेखील शेतीची बिलबिले आपले कर्तव्य समजून भरावीत.

शेतकऱ्यांच्या शेतीची वीजबिले माफ करावीत अन्यथा येणाऱ्या काळात स्वाभिमानी आंदोलन करेल, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी याकडे लक्ष वेधले. या प्रसंगी मुसळवाडी येथील सरपंच अमृत पंचायत समिती सदस्य सुरेश निमसे, रवींद्र आढाव, ज्ञानेश्वर मुरकुटे, सरपंच केशव शिंदे, किशोर बनकर उपस्थित होते.

Web Title: Does not discriminate against development work