शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणानंतर केंद्राबाहेर पडण्याची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

संगमनेर : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर डॉक्टरांकडून प्रत्येकाला किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्याचा सल्ला दिला जातो. राज्यात कोरोना ...

संगमनेर : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर डॉक्टरांकडून प्रत्येकाला किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्याचा सल्ला दिला जातो. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून ही लस सुरक्षित आहे. परंतु लस घेतल्यानंतर काहींना चक्कर येणे अथवा काही इतर त्रास होऊ शकतो. प्रत्येकालाच हा त्रास होईल, असे मुळीच नाही. मात्र, तरीही खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर केंद्राबाहेर पडण्याची घाई करू नका.

कोणत्याच प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोणताच आजार होत नाही. लसीकरण हे आजार होऊ नये अथवा आजार झाल्यास त्याचे दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावेत, याकरिता केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. भारतात क्षयरोग, पोलिओ, गोवर, काविळ ब, स्वाइन फ्लू या आजारावरील लसी देण्यात येतात. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात येत आहेत. त्या सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘फ्रंट लाइन वॉरियर्स’ म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आघाडीवर काम करणाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील नागरिक व त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी को-विन ॲपवर नोंदणी करत अनेकांनी लस घेतली आहे. काहींचे दोन्ही डोस पूर्ण झाले असून अनेकांचा दुसरा डोस बाकी आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर काहींना चक्कर आल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रमाण फारच कमी आहे.

परंतु तरीही लसीकरणानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. तातडीने लसीकरण केंद्राबाहेर पडू नये. काही त्रास झाल्यास केंद्रात डॉक्टर उपलब्ध असतात. त्यामुळे त्रास झालेल्या व्यक्तीवर तातडीने उपचार करता येतात. लस घेतल्यानंतर तत्काळ बाहेर पडून त्रास झाल्यास हे धोक्याचे ठरू शकते.

------------

वयोगटानुसार लसीकरण (१७ जूनपर्यंत)

पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी ४४२०३ - ३१९७१

फ्रंटलाइन वर्कर्स ५५४९० - १९९६३

१८ ते ४४ वयोगट २०३०५ - ६२८१

४५ ते ५९ वयोगट २४६७४२ - ४१२२७

६० वर्षांवरील २५१८४६ - ७९४४९

एकूण ६१८५८६ - १७८८९१

-----------------

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे लसीकरणानंतर अर्धा तास लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबण्याची सूचना केली जाते. तरीही कोणीही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर तत्काळ लसीकरण स्थळावरून जाऊ नये.

- डॉ. संदीप कचेरिया, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, संगमनेर

---------------

घरी जाण्याची घाई करूच नये

कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हे अत्यंत प्रभावी शास्त्र आहे. लसीकरण हा उपचार नाही, तर प्रतिबंधात्मक उपाय आहे आणि लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक मार्ग नाही. मास्क लावणे, शारीरिक अंतराचे नियम पाळणे आणि हात साबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. हे नियम प्रत्येकाने लसीकरण झाल्यानंतरही पाळणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई करूच नये. असेही वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी सांगितले.

..............

star 836

फोटो नेम : २२ कोरोना

ओळ : संगमनेरातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर सुरू असलेले लसीकरण.