शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना कोविड झाला तर हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

१) धीराने परिस्थिती हाताळावी कारण ९० टक्के वेळा लहान मुलांना खूपच सौम्य स्वरूपाचा आजार असतो. २) लहान मुलांना शक्यतो ...

१) धीराने परिस्थिती हाताळावी कारण ९० टक्के वेळा लहान मुलांना खूपच सौम्य स्वरूपाचा आजार असतो.

२) लहान मुलांना शक्यतो घरातच विलगीकरण अथवा आयसोलेशनमध्ये ठेवावे.

३) नेहमीच्या कुटुंबीयांसमवेत ठेवावे.

४) भरपूर पाणी पाजणे. लघवीचे प्रमाण, श्वासाचा दर, ऑक्सिजनचे प्रमाण याचा चार्ट ठेवावा.

५) तान्ह्या बाळाला स्तनपान चालू ठेवले पाहिजे. आई निगेटिव्ह असली तरीही.

६) बाळाच्या खेळण्याकडे तसेच नेहमीच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष ठेवणे. खेळणारे बाळ खूपच दिलासादायक असते.

७) पाच वर्षावरील मुलांना मास्क निश्चित वापरावा. दोन ते पाच वर्षांमधील मुलांना ते ठेवत असतील तर पालकांच्या निरीक्षणाखाली मास्क वापरावा.

८) ताप येत असल्यास फक्त पॅरासिटॅमॉल हे औषध १५ मिलीग्राम, दर किलोग्राम या प्रमाणात द्यावे. इतर औषध शक्यतो देऊ नये.

९) बाळाची आधीची कुठलीही जुन्या आजाराची औषधे चालू ठेवावी.

१०) प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार, पुरेसे पाणी, पुरेशी झोप व शारीरिक व्यायाम हे महत्त्वाचे आहेत. प्राणायाम, सूर्यनमस्कार, सुरक्षित गच्चीत धावा-धावी, जिने चढ-उतार असे विविध व्यायाम प्रतिकार शक्ती वाढवण्यास निश्चित मदत करतील.

११) बाळ पडून राहत असल्यास, श्वासाचा दर जास्त असल्यास अथवा ऑक्सिजनचे प्रमाण सतत पाच-दहा मिनिटे पेक्षा जास्त ९४ च्या खाली राहत असल्यास आपल्या बालरोग तज्ज्ञ यांचा सल्ला घ्या. अथवा जवळच्या कोविड बालरुग्ण विभागात संपर्क साधावा अथवा बाळाला तेथे दाखल करा.

हे करू नका

१) मुलांना तापाचे पॅरासिटॅमॉल व्यतिरिक्त कुठलेही औषध देऊ नये.

२) मुलांना वाफ देण्याचा अट्टहास करू नये. त्यातून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे

३) दोन वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्याचा अट्टहास करू नये.

४) मुलांना आजी-आजोबांच्या संपर्कात येऊ देऊ नये.

५) घरातील इतर मुलं जरी आरटीपीसीआर निगेटिव्ह असली तरीही त्यांना नातेवाइकांकडे पाठवू नये.

६) फळे व खाद्यपदार्थ वर्जित करू नयेत.

७) घरगुती औषधे, काढा यांचा भडीमार करू नये.

८) अफवांना बळी पडू नका

९) प्रतिकारशक्ती वाढविण्याचा बाजारू औषधावर विश्वास ठेवू नका.

१०) व्हाॅट्सॲपवरील आरोग्यविषयक माहिती आपल्या डॉक्टरांकडून पडताळून घ्या.

- डॉ. सचिन वहाडणे (बालरोग तज्ज्ञ)