नागेश विद्यालयात सोळाशे मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:37+5:302021-03-22T04:20:37+5:30

जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये दंत वैद्यकीय सागर शिंदे यांच्या हस्ते पुनर्वापर करता येतील, असे १ ...

Distribution of sixteen hundred masks in Nagesh Vidyalaya | नागेश विद्यालयात सोळाशे मास्कचे वाटप

नागेश विद्यालयात सोळाशे मास्कचे वाटप

जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये दंत वैद्यकीय सागर शिंदे यांच्या हस्ते पुनर्वापर करता येतील, असे १ हजार ६०० कापडी मास्क पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड पोलीस ठाणे भरोसा सेल अंतर्गत विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी भरोसा पेटीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.सागर शिंदे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, राजेंद्र कोठारी, विठ्ठल राऊत, प्रा.मधुकर राळेभात, प्रकाश सदाफुले, सुरेश भोसले, प्राचार्य बी. के. मडके, मुख्याध्यापिका के.डी. चौधरी, पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे, पोलीस नाईक संदीप आजबे, अनिता निकत, मनीषा घहिरे, शिक्षण विभाग समनव्यक प्रमोद ठेबरे, प्रा.रमेश बोलभट, प्रकाश तांबे, एनसीसी अधिकारी मयूर भोसले, दिलीप ढवळे, दत्तात्रय ढाळे, उमर कुरेशी, महादेव साळुंके, मोहन यादव आदी उपस्थित होते.

---

२१ जामखेड मास्क

Web Title: Distribution of sixteen hundred masks in Nagesh Vidyalaya