येथील नगरपरिषद हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या २० लाभार्थ्यांना ८ लाख ४० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी नगराध्यक्षा आदिक बोलत होत्या. यावेळी नगरसेवक मुक्तार शहा, रवी पाटील, कलीम कुरेशी, नगरसेविका वैशाली चव्हाण, रईस जहागीरदार, अहमद शहा, अनिल इंगळे, प्रधानमंत्री आवास योजनेचे विशाल तनपुरे उपस्थित होते. मुक्तार शहा म्हणाले, नगराध्यक्षा आदिक यांनी पाठपुरावा केल्याने राज्यात सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले शहरात मंजूर झाली. यासाठी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे विशेष सहकार्य लाभले. शहरात १ हजार ६१० घरकुलांना मंजुरी मिळाली. मात्र पालिकेकडे ८९२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी ५९४ लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. शहरातील जवळपास शंभरपेक्षा जास्त लाभार्थ्यांची घरे बांधून पूर्ण झाली आहेत. आजपर्यंत सुमारे ६ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
--------------