बस स्थानकावरील हिरकणी कक्ष धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:03+5:302021-02-11T04:23:03+5:30

प्रारंभी मोठा गाजावाजा करून हे कक्ष सुरू करण्यात आले, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते धूळखात पडले आहेत. माळीवाडा ...

The diamond room at the bus station is dusty | बस स्थानकावरील हिरकणी कक्ष धूळखात

बस स्थानकावरील हिरकणी कक्ष धूळखात

प्रारंभी मोठा गाजावाजा करून हे कक्ष सुरू करण्यात आले, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते धूळखात पडले आहेत. माळीवाडा हिरकणी कक्षाची पाहणी केली असता, हा कक्ष चार पत्र्यांचा आडोसा करून तयार केलेला आढळला. कक्षाचा दरवाजाही नीट उघडत नव्हता. जोर लावून दरवाजा उघडला, तर आत धूळच धूळ होती. एक तुटलेली खुर्ची त्या ठिकाणी आढळली. महिलांना बसण्यासाठी स्वच्छ जागा, विजेची, पंख्याची सोय तेथे नव्हती. इतर कक्षांचीही हीच अवस्था आहे. स्वस्तिक बस स्थानकातून पुणे, मुंबई अशा लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात, परंतु या स्थानकात अद्याप हिरकणी कक्षच नाही. त्यामुळे स्तनदा मातांची मोठी गैरसोय होते.

-----------

महिलांना माहितीच नाही

माळीवाडा बस स्थानकात या कक्षाबाबत काही महिलांना विचारले असता, त्यांना याविषयी काहीही सांगता आले नाही. काहींना तर हा कक्ष कुठे आहे, याचीच माहिती नव्हती.

--------------

लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून बस बंद असल्याने हिरकणी कक्ष धूळखात पडले आहेत, परंतु लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल. माळीवाडा व तारकपूर स्थानकात कक्ष आहेत. स्वस्तिक बस स्थानकातही लवकरच कक्ष स्थापन केला जाईल.

- अविनाश कल्हापुरे, आगार व्यवस्थापक, तारकपूर

-------

फोटो - १०हिरकणी कक्ष

नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकातील हिरकणी कक्ष धूळखात पडला आहे.

Web Title: The diamond room at the bus station is dusty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.