देवगडला दत्तजयंतीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:04+5:302020-12-25T04:17:04+5:30

नेवासा : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने सामाजिक अंतराचे पालन करत मोजक्याच दहा भाविकांच्या उपस्थितीत अखंड ...

Devgad starts on Datta Jayanti | देवगडला दत्तजयंतीस प्रारंभ

देवगडला दत्तजयंतीस प्रारंभ

नेवासा : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने सामाजिक अंतराचे पालन करत मोजक्याच दहा भाविकांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास नुकताच प्रारंभ झाला असून यात्रा रद्द असल्याने कोणत्याही व्यावसायिकांनी येथे दुकाने आणू नयेत, असे आवाहन श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

भास्करगिरी महाराज म्हणाले, श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी सुरू केलेला दत्त जन्मोत्सव नियमानुसार सुरू आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत श्री दत्त मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दहा भाविकांच्या उपस्थितीत सुरू झाले आहे. नित्यनेमाने पहाटे काकडा आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, रात्री वीस ते पंचवीस भाविकांच्या उपस्थितीत किर्तनाचे कार्यक्रम होत आहे. दरवर्षी ७ ते ८ लाख भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने शासन व प्रशासन यांनी घालवून दिलेल्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने दत्तजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय श्री दत्त मंदिर देवस्थानने घेतला असून नेहमी होणारे अन्नदान कार्यक्रम ही रद्द करण्यात आलेले आहे. मंगळवारी मंदिरामध्ये मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा होणार आहे. यावर्षी यात्रा रद्द असल्यामुळे व्यावसायिकांनी येथे दुकाने आणू नये. शासनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.

Web Title: Devgad starts on Datta Jayanti