शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा ‘ताप’ वाढला, प्रशासन ‘थंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. तापाच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे डेंग्यूचे आढळून आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. तापाच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे डेंग्यूचे आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचा फैलाव होत असताना प्रशासन मात्र थंड आहे. कोणत्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे चांगलेच संतापले. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्हा रुग्णालयात डेंग्यूची चाचणी सुरू करून डेंग्यू रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी आरोग्य यंत्रणेला दिला आहे.

कोरोनासोबतच पावसाळी साथीचे आजार वाढत आहेत. सध्या अधूनमधून पाऊस सुरू असल्याने डासांचे प्रमाणही वाढलेले आहे. शहर व जिल्ह्यातील दाट लोकवस्ती, झोपडपट्टी तसेच सोसायट्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. तापाचे रुग्ण वाढत असून त्यात निम्मे रुग्ण डेंग्यूचे संशयित म्हणूनच आढळून आलेले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह आरोग्य व महसूल यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये डेंग्यूवर उपचार करणे, डेंग्यू रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे आढळून आल्याने विभागीय आयुक्त गमे यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. गमे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. डेंग्यूच्या चाचण्याही होत नाहीत. प्रशासन गंभीर नसल्याने रुग्ण वाढत असल्याने गमे यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त केला.

---

जिल्ह्यात डेंग्यूचे ६२ रुग्ण

अहमदनगर शहरात गत ऑगस्ट महिन्यात १७ तर सप्टेंबर महिन्यात १६ असे एकूण ३३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी ९१ जणांचे नमुने तपासण्यात आले होते. ग्रामीण भागात ऑगस्टमध्ये २३, तर सप्टेंबरमध्ये ६ रुग्ण ्से एकूण २९ रुग्ण आढळल्याचे आरोग्य यंत्रणेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चिकुमगुनिया आणि हिवतापाचे रुग्ण मात्र या दोन महिन्यात आढळून आले नाहीत. नगर शहरातही प्रत्यक्षात डेंग्युच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीला उपचार घेणाऱ्यांच्या संख्येवरून हे दिसून येते आहे.

------------

डेंग्यूच्या चाचण्या करण्याचा आदेश

डेंग्यूच्या संशयितांची संख्या जास्त आहे. मात्र, त्यांच्या चाचण्या होत नसल्याचे दिसून आले आहे. अशा संशयित रुग्णांची डेंग्यू चाचणी करण्याचा आदेशही विभागीय आयुक्तांनी दिला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात उपचार करावेत. डेंग्यू रोखण्यासाठी फवारणीसह इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचनाही यंत्रणेला दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होतात, मात्र ‘एलायझर’ ही चाचणी केली जात नाही. त्यामुळे ही चाचणी जिल्हा रुग्णालयात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

--------------

डेंग्यूची लक्षणे : अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे, त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षणे जवळजवळ एक आठवडा टिकतात. परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकतो.

चिकुनगुनिया लक्षणे : चिकनगुनिया तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, अति थकवा येतो. डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजते.

---

हिवताप, मलेरिया लक्षणे : सामान्यत: हिवताप आजारात थंड अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम येण्याची अवस्था या तीन अवस्था असतात. थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्वरेने वाढत जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.