यशवंतराव होळकरांचे जन्मस्थळ शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:15+5:302021-08-15T04:23:15+5:30
मराठा साम्राज्यातील दिग्गज सेनापती श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांनी देशासाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांनी सलग ...

यशवंतराव होळकरांचे जन्मस्थळ शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी
मराठा साम्राज्यातील दिग्गज सेनापती श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांनी देशासाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांनी सलग १८ लढाया जिंकल्या होत्या. महापराक्रमी महाराजा अशी त्यांची इतिहासात नोंद आहे. यशवंतराव होळकर यांच्या वाफगाव येथील जन्मस्थळाची इतिहासात नोंद आहे. राज्यातील इतर ऐतिहासिक किल्ल्यांचा विकास आराखड्यामध्ये समावेश आहे. यशवंतरावांचे जन्मस्थळ असलेला किल्ला मात्र रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्यामुळे राज्य शासनाकडे हस्तांतरित झालेला नाही. सध्या या किल्याची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा किल्ला ३० ऑगस्टपूर्वी शासनाकडे हस्तांतरित करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे, तसेच या किल्ल्यासाठी बहुजन समाजाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातून शरद पवार यांना पत्र पाठविणार असल्याचे जऱ्हाड व सोलनकर यांनी सांगितले.