अपघातात तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:32 IST2019-03-15T23:32:07+5:302019-03-15T23:32:19+5:30
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

अपघातात तरुणाचा मृत्यू
औरंगाबाद : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना १४ मार्च रोजी रात्री सात वाजता क्रांतीचौकातील धार्मिक स्थळाजवळ घडली.
अब्दुल हमीद अब्दुल माजीद खान (१८, रा. सिल्क मिल कॉलनी), असे मृत युवकाचे नाव आहे. अब्दुल हमीद हा गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकीने क्रांतीचौकाकडून पैठणगेटकडे जात होता. यावेळी राँगसाईडने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात हमीदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो घटनास्थळी बराच वेळ पडून होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हमीदला रिक्षाचालकाने माणूसकी दाखवीत घाटीत दाखल केले. उपचारादरम्यान हमीदचा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.