खुनाच्या गुन्ह्यात दोघांना जन्मठेप

By Admin | Updated: July 24, 2014 00:17 IST2014-07-23T23:17:22+5:302014-07-24T00:17:02+5:30

अहमदनगर : भांडणे सोडविण्यास गेलेल्या पोपटराव भाऊसाहेब दळवी यांना तरुणांनी मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

Death sentence for both of them | खुनाच्या गुन्ह्यात दोघांना जन्मठेप

खुनाच्या गुन्ह्यात दोघांना जन्मठेप

अहमदनगर : भांडणे सोडविण्यास गेलेल्या पोपटराव भाऊसाहेब दळवी यांना तरुणांनी मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात दोषी असलेले सागर विजय काळे (वय २०) आणि विशाल अशोक काळे (वय २४) यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठालली आहे. यातील तिसऱ्या महिला आरोपीला तीन महिने कारावासाची शिक्षा झाली.
नगर येथील शीलाविहार भागात रस्त्यावर तरुणांमध्ये ६ मे २०११ रोजी आपआपसात भांडणे सुरू होती. ती भांडणे पाहून रस्त्याने जात असलेले ताराचंद दळवी (फिर्यादिचे चुलते) यांनी भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी त्यांनाच शिविगाळ, दमदाटी केली. त्यामुळे दळवी यांनी जवळच राहत असलेल्या दळवी कुटुंबियांच्या घराचा आसरा घेतला. यावेळी तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या प्रकरणातील फिर्यादी अभिजित पोपटराव दळवी, पोपटराव दळवी व इतर साक्षीदार यांनी तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने तरुणांनी पोपटराव दळवी व इतरांना मारहाण केली. त्यामध्ये पोपटराव यांच्या छातीवर व अन्य शरीरावर मार लागल्याने ते जागेवरच खाली पडले. जमलेल्या लोकांनी त्यांना आधी एका खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी पोपटराव दळवी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अभिजित (मुलगा) याने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रमेश जगताप यांनी ९ साक्षीदार तपासले. आरोपींनी केलेला गुन्हा साक्षीदारांनी पाहिला होता. वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अभियोग पक्षास पूरक होती. कागदोपत्री पुरावा, तोंडी पुरावा हा आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास पुरेसा ठरला. मयतास जिवे मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असा आरोपींच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला. मात्र सरकार पक्षाने तो खोडून काढला. अ‍ॅड. जगताप यांनी आरोपींनी केलेला खुनाचा गुन्हा गंभीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Death sentence for both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.