शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढणार

By admin | Updated: December 16, 2015 23:06 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आवर्तनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली.

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आवर्तनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली. यावर महाजन यांनी आवर्तन तीन दिवसांनी वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आ. जगताप यांनी बुधवारी नागपूर येथे जलसंपदा मंत्री महाजन यांना कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी वाढविण्याबाबत पत्र दिले. आ. जगताप यांनी या पत्रात म्हटले आहे, कुकडीचे पाण्यासाठी आवर्तन सोडल्यास २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी दोन ते अडीच टीएमसी पाणी लागते. हे आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा १५ हजार ७३७ हेक्टर, कर्जत १५ हजार ७१५ हेक्टर, करमाळा १२ हजार ६२५ हेक्टर, पारनेर ७ हजार ५७७ हेक्टर क्षेत्र गृहीत धरून नियोजन केले आहे. कुकडी लाभक्षेत्रात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी जमिनीत जादा प्रमाणावर मुरणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवर्तन कालावधी वाढविणे आवश्यक आहे. आ. जगतापांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा मंत्री महाजन यांनी तीन दिवसांनी आवर्तन वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. श्रीगोंदा तालुक्यात वेळेवर आवर्तन सुरू करण्यात आले. किमी १३२ विसापूर कालवा सुरू असून डी वाय १३ व १४ दि. १७ पासून सुरू होणार आहेत, अशी माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. २ कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांनी दिली.