ट्रॅक्टरखाली चिरडून दोन तरुण ठार; जामखेड तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:36 IST2020-06-26T17:35:00+5:302020-06-26T17:36:23+5:30
उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली.

ट्रॅक्टरखाली चिरडून दोन तरुण ठार; जामखेड तालुक्यातील घटना
खर्डा : उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली.
शुभम दत्तात्रय लोहकरे (वय १४) व भगवान श्रीरंग उकीरडे(वय २२) अशी अपघातातील मृत तरूणांची नावे आहेत. हे दोन्हीही मुले धनेगाव येथील आहेत. जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेटकेवाडी (जि.उस्मानाबाद) येथून उसाचे वाढे घेऊन एक ट्रॅक्टर धनेगावच्या दिशेने येत होता. यावेळी धनेगाव परिसरातील कॅनॉलच्या अवघड वळणाचा अंदाज न आल्याचे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर जागेवरच उलटला. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेले शुभम दत्तात्रय लोहकरे व भगवान श्रीरंग उकीरडे हे दोघे ट्रॅक्टरखाली चिरडून जागीच ठार झाले. या घटनेमुळे धनेगाव परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.