पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:50 IST2023-08-23T15:45:54+5:302023-08-23T15:50:41+5:30
अहमदनगरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे.

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात उभा राहिला, विधी सुरू झाले, एवढ्यात पहिली पत्नी आली अन्...
अहमदनगरमधून एक अजब प्रकरण समोर आले आहे. पहिली पत्नी हयात असताना त्या पत्नीला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला आणि नववधूला पहिल्या पत्नीने धडा शिकवल्याचे प्रकरण समोर आले आहे. पतीने अहमदनगरमध्ये दुसऱ्या लग्नासाठी नियोजन केले होते, याची माहिती पहिल्या पत्नीला लागली. लग्नाच्या वेळेअगोरच पहिली पत्नी लग्नमंडळात आली त्यामुळे मोठा भांडाफोड झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.
“... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु”; ठाकरे गटातील आमदाराने केले स्पष्ट
अधिक माहिती अशी, जालना जिल्ह्यातील विशाल पवार नावाच्या व्यक्तीने बारा वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत लग्न केलं होतं. पवार यांचं अगोदर लग्न झालं असतानाही ते दुसर लग्न करणार असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. ही माहिती मिळताच पहिल्या पत्नीने लग्नाच्या काही तास आधीच आई, वडील नातेवईकांना घेऊन अहमदनगर गाठले.
यानंतर त्यांनी पवार यांचे लग्न ज्या मंगल कार्यालयात होणार होतं, त्या ठिकाणी गेले आणि लग्नमंडपात गोंधळ घालायला सुरुवात केली. पहिल्या पत्नीने नववधूला मारहाणही करण्यास सुरुवात केली. लग्नमंडपात उपस्थित असणाऱ्यांना काहीच समजायच्या आत हा गोंधळ सुरू झाला.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लग्नमंडपातील सर्व वरात पोलीस ठाण्यात आणली. विशाल पवार याच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पवार कोणतीही माहिती न देता तसेच घटस्फोट न घेता दुसरे लग्न करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांनी विशाल पवार यांच्याविरुद्ध भादवी 494 नुसार पुन्हा दाखल केला आहे.