अण्णा हजारे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:21+5:302021-04-07T04:22:21+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका ...

अण्णा हजारे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका एस. आर. शेळके यांनी हजारे यांना ही लस दिली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिलाषा शिंदे, दिलीप देशमुख यावेळी उपस्थित होते.
सकाळी ११ वाजण्याच्या सुुमारास हजारे ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर परिचारिका शेळके यांनी त्यांना लस दिली. लसीकरणानंतर दोन दिवस त्रास होण्याची शक्यता असल्याने अण्णांनी आराम करणे पसंत करावे, अशी विनंती डॉ. लाळगे यांनी यावेळी केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून नागरिकांनी सहकार्य केले तरच त्यात यश येणार असल्याने नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली.
०६ अण्णा हजारे