पाणलोटात संततधार सुरूच; भंडारदरा ७० तर निळवंडे ६० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 15:09 IST2020-08-12T15:08:32+5:302020-08-12T15:09:09+5:30
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे सुमारे पावणे पाच इंच तर रतनवाडी येथे चार इंच पावसाची नोंद झाली. यामुळे बुधवारी सकाळी भंडारदरा धरणात २६९ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. धरण ७० टक्के तर निळवंडेतील साठा ५९ टक्के झाला होता.

पाणलोटात संततधार सुरूच; भंडारदरा ७० तर निळवंडे ६० टक्के भरले
राजूर/भंडारदरा : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे सुमारे पावणे पाच इंच तर रतनवाडी येथे चार इंच पावसाची नोंद झाली. यामुळे बुधवारी सकाळी भंडारदरा धरणात २६९ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. धरण ७० टक्के तर निळवंडेतील साठा ५९ टक्के झाला होता.
भंडारदरा धरणात होणा-या नवीन पाण्याची आवक विचारात घेता पाणलोटात पावसाचा जोर वाढला नाही तर १५ आॅगस्टपर्यंत धरण भरण्याची शक्यता धुसर वाटत आहे.
बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात घाटघर येथे १२२ मिलिमीटर तर रतनवाडी येथे ९७ मिलिमीटर, पांजरे येथे ८५ मिलिमीटर तर भंडारदरा येथे ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
भंडारदरा धरणात संपलेल्या चोवीस तासात २६९ दशलक्ष घनफूट नविन पाण्याची आवक झाली.यामुळे धरणात ७ हजार ७१७ दशलक्ष घनफुटापर्यंत पाणीसाठा पोहचला होता.