अल्पयीन मुलीला पळवून नेण्याचा कट उघड, मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात दिले
By अण्णा नवथर | Updated: June 3, 2023 16:35 IST2023-06-03T16:35:21+5:302023-06-03T16:35:29+5:30
येथील रामवडी परिसरातील क्लास गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला.

अल्पयीन मुलीला पळवून नेण्याचा कट उघड, मुलीला आई-वडीलांच्या ताब्यात दिले
अहमदनगर: येथील रामवडी परिसरातील क्लास गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. मुलीला नाशिक येथून ताब्यात घेऊन आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नगर शहरातील एका १६ वर्षीय मुलीची सोशल मिडियावर एका मुलाशी ओळख झाली. त्याने मुलीला फोन करून नाशिका येण्यास सांगितले. तोपर्यंत सबंधित मुलीने मुलाला प्रत्यक्षात पाहिलेले नव्हते. फोन करून बोलविल्यानुसार मुलगी बसने नाशिकला गेली. तेथून ती रेल्वेने कल्याणला जाणार होती.
दरम्यान मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना पोलिसांना दिली. तोफखाना पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असतान सदर मुलगी नाशिक येथील रेल्वेस्टेशनवर आढळून आली. तिला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.