शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आघाडीत फाटाफूट, निवड बिनविरोध

By admin | Updated: March 26, 2024 15:22 IST

अहमदनगर : नगर तालुका पंचायत समितीवर आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला. सेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले यांची सभापतीपदी तर भाजपाचे शरद झोडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

अहमदनगर : नगर तालुका पंचायत समितीवर आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला. सेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले यांची सभापतीपदी तर भाजपाचे शरद झोडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडीची प्रक्रिया बिनविरोध झाली.नगर पंचायत समिती कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून सभापती-उपसभापती पदासाठी निवडीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वामन कदम यांनी कामकाज पाहिले. सभापतीपदासाठी सेनेकडून संदेश कार्ले यांनी तर राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांनी अर्ज दाखल केले. उपसभापतीपदासाठी भाजपाकडून शरद झोडगे यांनी तर काँग्रेसकडून उज्ज्वला कापसे यांनी अर्ज दाखल केले. मात्र पंचायत समितीत सेना-भाजपाचे ७ सदस्य तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ५ सदस्य असे पक्षीय बलाबल असले तरी काँग्रेसच्या जयश्री दरंदले व ताराबाई कासार तसेच राष्ट्रवादीचे राजू शेवाळे यांनी युतीच्या गोटात सामील होणे पसंत केल्याने मोकाटे व कापसे एकाकी पडले. अर्ज माघारीच्या वेळी त्यांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कदम यांनी संदेश कार्ले यांची सभापतीपदी व शरद झोडगे यांची उपसभापतीपदी निवड जाहीर केली. यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (तालुका प्रतिनिधी)पडद्याआडून घडल्या घडामोडीसभापती-उपसभापतीपदासाठी निवड होण्यापूर्वी नगर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. आ.शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी सर्व सदस्यांच्या स्वतंत्र मुलाखती घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचा एक सदस्य असे मिळून १२ पैकी १० चे संख्या बळाची जुळवाजुळव केली. उपसभापतीपदासाठी अर्ज केलेल्या उज्ज्वला कापसे याही नंतर युतीच्या गोटात सामील झाल्या. यात सर्वपक्षीय एकत्र आल्याचे दिसून आले.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये फाटाफूट झाल्याने मी सभापतीपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे दोन सदस्य युतीत सामील झाले तर उपसभापतीचा आमचा उमदेवारही युतीने धनशक्तीच्या जोरावर फोडला. यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतली.-गोविंद मोकाटे (सदस्य, राष्ट्रवादी)पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना देऊ. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध करून माझ्यावर विश्वास दाखवल्याने पक्षीय राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करू. पंचायत समितीला सक्षम पदाधिकारी मिळाल्याने प्रशासनात व विकास प्रक्रिया आता गतिमान करून कामकाजात पारदर्शकता आणू.-संदेश कार्ले (सभापती, नगर)