संगमनेर बसस्थानकाबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:17 IST2020-02-23T17:17:04+5:302020-02-23T17:17:37+5:30
संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांजवळ रविवारी सकाळी एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला.

संगमनेर बसस्थानकाबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
संगमनेर : संगमनेर बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांजवळ रविवारी सकाळी एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला.
याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अंगाने मध्यम, उंची साधारण पाच फूट पाच इंच, चेहरा गोल, डोक्यावरील केस कापलेले, वाढलेली दाढी, अंगात तीन बटनांचा सफेद रंगाचा मळालेला शर्ट, सफेद रंगाचे जॅकेट व धोतर तसेच पोटावर जुन्या जखमेची खून असे या मृतदेहाचे वर्णन आहे.
सदर व्यक्तीबाबत कृणाला काही माहिती असल्यास संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलीस हेड कॉँस्टेबल आर. व्ही. भुतांबरे यांनी केले आहे. दरम्यान रविवारी सकाळी बसस्थानकाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांची परिसरात गर्दी झाली होती. मृतदेहाची ओळख पटविण्याची काम सुरू आहे. ओळख पटल्यानंतर या इसमाचा मृत्यू कशाने हे स्पष्ट होणार आहे.