शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

रेबीजची लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची सिव्हिलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

राहुरी तालुक्यातील गुहा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याने सात ते आठ ग्रामस्थांना चावा घेतला आहे. त्यामुळे ...

राहुरी तालुक्यातील गुहा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याने सात ते आठ ग्रामस्थांना चावा घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांसह नातेवाइकांची चांगलीच धावपळ उडाली. गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर येथे रेबीज लस उपलब्ध नाही. ही लस तालुक्यात कुठेच उपलब्ध नसून त्यासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागेल. तेथेही लस उपलब्ध नसल्यास पुण्यातील ससूनला जावे लागेल, अशी माहिती स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दिली.

त्यानंतर रुग्णांनी कपाळावर हात मारत सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता धरला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लस घेऊन रुग्णांनी सुटकेचा निश्वास सोडला. ऐन एकादशीच्या दिवशी सिव्हिल रुग्णालयाची वारी करावी लागल्याने मात्र रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

.....................

प्रतिसाद नाही

रेबीजबाबत माहिती घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. गणेश आडभाई यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क केला. त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

.........................

पिसाळलेल्या कुत्र्याचा गावातील तरुणांच्या मदतीने बंदोबस्त केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. रेबीज लसीबाबतीत आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

- रामा बर्डे, उपसरपंच, गुहा

210721\img-20210721-wa0187.jpg

रेबीज'ची लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची 'सिव्हिल'वारी

गुहा येथील आरोग्य केंद्रातील प्रकार; रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा?