नगरमध्ये सिनेस्टाईल दरोडेखोरांना अटक
By अण्णा नवथर | Updated: December 9, 2023 17:18 IST2023-12-09T17:18:21+5:302023-12-09T17:18:43+5:30
श्रीगोंदा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने सापळा रचला.

नगरमध्ये सिनेस्टाईल दरोडेखोरांना अटक
अहमदनगर : श्रीगोंदा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने सापळा रचला. मात्र पोलिसांना पाहता दरोडेखोरांनी धुम ठोकली. परंतु, पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना अटक केली असून, पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. अथर्व अनिल चौधरी, (वय २१ वर्षे, रा. कोहकडी, ता. पारनेर ), अक्षय उफ काळ्या नानासाहेब काळे ( वय २५ वर्षे, रा. निमोण, शिरुर, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपी हे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेलवंडी फाटा येथे सापळा रचला. दोघेजण संशयितरित्या येताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चोरटे पळून जावू लागले. मात्र पोलिसांनी आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.