कर्मवीर काळे यांच्याकडूनच सामाजिक बांधिलकीचे बाळकडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:19+5:302021-04-07T04:22:19+5:30
कोपरगाव : माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी आजीवन समाज हिताचा विचार करून आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वेचलं आहे. ...

कर्मवीर काळे यांच्याकडूनच सामाजिक बांधिलकीचे बाळकडू
कोपरगाव : माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी आजीवन समाज हिताचा विचार करून आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वेचलं आहे. त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण, पाणी, सहकार व सामाजिक क्षेत्रात बजावलेली कामगिरी अजोड आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही शिकवण आजोबांनीच परिवाराला दिली. तसेच त्यांच्याकडूनच सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगावातील कोसाका उद्योग समूहाचे शिल्पकार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली. यावेळी आमदार काळे बोलत होते.
काळे म्हणाले, वैश्विक कोरोना महामारीने संपूर्ण विश्वाला बेजार केले आहे. तरी त्यावर मात करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन जनतेला अपेक्षित असलेली विकासाची कामे मार्गी लावणार आहे. तसेच जनतेला कठीण काळात आधार देण्यास मी अखंडपणे बांधील आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी.
याप्रसंगी माजी आमदार अशोक काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, आयांश काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, शरदराव पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधुजी कोळपे, गोदावरी खोरे ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते आदी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून उपस्थित होते.
...........
मोफत कोरोना लसीकरणाचा शुभारंभ
माजी खासदार काळे यांच्या शंभराव्या जयंतीचे औचित्य साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरणासाठी घेऊन जाणाऱ्या मोफत बससेवेचा शुभारंभ माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला.