चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त
By अण्णा नवथर | Updated: June 3, 2023 16:25 IST2023-06-03T16:25:00+5:302023-06-03T16:25:13+5:30
याप्रकरणी हॉटेल चालक केसाराम हेमाराम जाट ( ३४, रा. चौधरी पॅलेस विळद) यास अटक करण्यात आली आहे.

चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त
अहमदनगर: नगर- मनमाड रोडवरील चौधरी पॅलेस धाब्यावर छापा टाकत एमआयडीसी पोलिसांनी सुमारे दाेन लाख ८७ हजारांचा अफूची पावडर जप्त केली. याप्रकरणी हॉटेल चालक केसाराम हेमाराम जाट ( ३४, रा. चौधरी पॅलेस विळद) यास अटक करण्यात आली आहे.
अफूच्या बोंडापासून पावडर तयार करून त्याची विक्री धाब्यावर आलेल्या ग्राहकांना केली जात आहे, अशी माहिती गुप्त बातमीदारामाफत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी चौधरी पॅलेस राजस्थानी हॉटेलवर धाबा टाकला असता काही इसम अफूच्या बोंडापासून तयार केली पावडर विकत असताना आढळून आले.