शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा महापौर करण्यासाठी कर्डिले यांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 17, 2016 00:02 IST

अहमदनगर : शिवसेनेने नगरमध्ये महापौर पदाच्या बोहल्यावर चढण्याची तयारी केली असताना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून वेगळीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

अहमदनगर : शिवसेनेने नगरमध्ये महापौर पदाच्या बोहल्यावर चढण्याची तयारी केली असताना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून वेगळीच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दोन्ही काँग्रेसची साथ घेऊन भाजपचा महापौर करु शकतो, असा प्रस्ताव त्यांनी पक्षस्तरावर मांडला असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपच्याच स्थानिक बहुतांश नगरसेवकांना मात्र हा प्रस्ताव मंजूर नाही.
शिवसेनेकडे सध्या स्वत:चे २० तर मनसेचे दोन नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना त्यांनी सहलीवर पाठविले आहे. याशिवाय त्यांनी भाजपचे पाच नगरसेवकही सहलीवर नेले होते. दोन्ही काँग्रेस या पदासाठी इच्छुक नसल्याने सेनेला सहजासहजी महापौरपद मिळेल अशी शक्यता आहे. परंतु ऐनवेळी भाजपकडून वेगळ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सेनेसोबत गेलेल्या नगरसेवकांना भाजपने बोलवून घेतले आहे. पक्षाचा निर्णय होण्याअगोदरच तुम्ही सेनेसोबत कसे गेलात? या कारणावरुन प्रदेशाध्यक्षांनी त्यांना बोलविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या नगरसेवकांची मते पक्षाने जाणून घेतल्यानंतर सेनेसोबत जाण्यास बहुतेक नगरसेवकांनी अनुकूलता दर्शविल्याचे या गोटातून सांगण्यात आले.
दरम्यान, सेनेला साथ करण्याऐवजी दोन्ही काँग्रेसच्या मदतीने आपलाच महापौर करायचा, असा एक प्रस्ताव भाजपमधील कर्डिले यांच्याकडून पुढे आला आहे. त्यांनी त्यादृष्टीने चाचपणी केली आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला आपण सोबत आणू शकतो, असा त्यांचा दावा असल्याचे समजते. भाजपचा महापौर झाल्यास कर्डिले यांचे पक्षात वजन तयार होऊन मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी त्यांना त्याचा फायदा मिळेल. मात्र, कर्डिले यांचा हा प्रस्ताव भाजपच्या अन्य नेत्यांना मान्य नाही. ‘कर्डिले यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, सेना-भाजप ही पारंपरिक युती असल्याने आम्ही सेनेलाच साथ करणार आहोत. आमचा निर्णय आम्ही प्रदेशलाही कळविला आहे’, असे भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. आमचा निर्णय केवळ उपमहापौर कोणाला करायचे? यावर अडला असून ते नाव रात्री उशिरा जाहीर होईल, असेही या नेत्याने सांगितले. दरम्यान, महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी अखेरची मुदत आहे. आत्तापर्यंत सेनेच्या सुरेखा कदम वगळता कुणीही अर्ज नेलेला नाही.
उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाचे वितरण केले जाणार आहे. सेनेच्या कदम वगळल्या तर अन्य कोणत्याच पक्षाकडून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतलेला नाही. कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतला असला तरी तो दाखल केलेला नाही. युतीच्या नियमानुसार उपमहापौर पद हे भाजपच्या वाट्याला आहे. त्यामुळे उपमहापौर कोण हे तेच ठरवतील, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात भाजपमध्येही उपमहापौर पदावरून रस्सीखेच सुरू आहे.
महापौर पदासाठी सेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवारचा मुहूर्त काढला खरा पण भाजपकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने सेनेला मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. नगरच्या राजकीय वर्तुळात यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सेना-भाजप युती होणार की तुटणार याचे चित्र स्पष्ट होईल.
सेनेने सत्ता स्थापनेसाठीच्या बेरजेत भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. तीन दिवसांपासून सेना-भाजप युती होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐनवेळी युती तोडली तर काय, या दृष्टीने पुढील चालही सेनेने आखली आहे. युती तुटू नये, यासाठी सेनेचे प्रदेश व स्थानिक नेते दोन दिवसांपासून भाजपच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
गुरूवारी सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या पत्नी सुरेखा कदम या महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. मात्र भाजप नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी सोबत नसल्याने जनतेत वेगळाच संदेश जाईल. त्यामुळे सेनेच्या कदम यांचा अर्ज गुरूवारी दाखल झाला नाही.