फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:32:23+5:302014-07-13T00:17:43+5:30
श्रीरामपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने रद्द करून तिचे जन्मठेपेत रूपांतर केले.

फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा
श्रीरामपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली फाशीची शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने रद्द करून तिचे जन्मठेपेत रूपांतर केले.
नेवासा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी अनिल पवार याला श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जानेवारी २०१४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. आरोपीच्या वतीने अॅड. कैलास औताडे यांनी युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने आरोपीची फाशीची शिक्षा रद्द ठरवून त्याचे रूपांतर जन्मठेपेत करण्याचा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. जी. के. ढिगळे यांनी काम पाहिले.
शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर झालेला आरोपी अनिल पवार हा नगर येथील एका महिलेच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगीत आहे.
(वार्ताहर)