दरोडा टाकायला आले आणि जेरबंद झाले;  पोलिसांनी केला सिनेस्टाईलने पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:26 IST2020-08-22T16:26:52+5:302020-08-22T16:26:52+5:30

 राहुरी येथे  दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले चार  दरोडेखोरांना  पोलिसांनी शुक्रवारी (२१ आॅगस्ट) रात्री जेरबंद केले. दोन जण अंधाराचा फायद घेऊन फरार झाले.

Came to rob and confiscated; Police chased Keila Cinestyle | दरोडा टाकायला आले आणि जेरबंद झाले;  पोलिसांनी केला सिनेस्टाईलने पाठलाग

दरोडा टाकायला आले आणि जेरबंद झाले;  पोलिसांनी केला सिनेस्टाईलने पाठलाग

 राहुरी :   येथे  दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले चार  दरोडेखोरांना  पोलिसांनी शुक्रवारी (२१ आॅगस्ट) रात्री जेरबंद केले. दोन जण अंधाराचा फायद घेऊन फरार झाले.

सागर अशोक बर्डे (वय २०), राहुल  पोपट आघाव (वय १९), रवींद्र सूर्यभान माळी (वज्य २१), विनायक गणपत बर्डे (वय १९, सर्व रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून मोटारसायकल जप्त केली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांंना २७ आॅगस्टपासून पोलीस कोठडी दिली आहे. फरार दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

      दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोन मोटारसायकलवरून सहा जण राहुरी येथील पुलानजीक आले होती. ते संशयास्पद  हालचाली करत असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. 

पोलीस निरीक्षक मुकुंद  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस सचिन बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलीस हेडकॉन्स्टेबल आयुब शेख, पोलीस नाईक शिवाजी खरात, पोलीस नाईक संभाजी शेडगे, पोलीस नाईक निलेश मेटकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजणे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण कोकण, पोलीस कॉन्स्टेबल रंगनाथ यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून चार जणांना जेरबंद केले. दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.
 

Web Title: Came to rob and confiscated; Police chased Keila Cinestyle