शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
4
‘वाह मोदीजी वाह! देशाला बर्बाद तुम्ही करायचं आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
5
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
6
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
7
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
8
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
9
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
10
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
11
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
12
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
13
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
14
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
15
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
17
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
18
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
19
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
20
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST

संगमनेर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या लाटेत करण्यात आलेला लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले निर्बंध ...

संगमनेर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पहिल्या लाटेत करण्यात आलेला लॉकडाऊन आणि दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले निर्बंध यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस आगारातच उभ्या होत्या. अनलॉकनंतर आता बसेस धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकात खाद्यपदार्थ, पाणी बॉटल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दोन पैसे मिळत असून त्यांच्या संसाराची गाडीही हळूहळू पुन्हा रूळावर येते आहे.

कोरोनाचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झाला. याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळदेखील अपवाद नव्हते. कोरोनाकाळात महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. नाशिक-पुणे दोन महानगरांना जोडणारा रस्ता संगमनेर तालुक्यातून जात असल्याने संगमनेर स्थानकात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असायची. कोरोना येण्याआधी संगमनेर आगाराचे महिन्याचे उत्पन्न साधारण दीड कोटीपर्यंत होते. येथील बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करून अनेक तरुण उदरनिर्वाह करायचे. मात्र, कोरोनामुळे बसेस बंद झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले. यापैकी अनेक जण हातावर पोट असलेले. त्यामुळे ‘हातावर कमवायचे आणि हातावर खायचे अशीच त्यांची परिस्थिती. कोरोनाकाळात त्या सर्वांचे मोठे हाल झाले. यातील काहींनी शेतीची कामे केली, काही मजुरी जायचे. संसाराचा गाडा हाकताना दोन पैसे कष्ट करून कसे मिळतील, यासाठी मिळेल ती कष्टाची कामे केल्याचे बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी सांगितले.

संगमनेर आगारात एकूण ५३ बसेस असून, त्यात दोन शिवशाही तर दोन सेमी लक्झरी बसेस आहेत. बसस्थानकातून लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला तसेच काही ग्रामीण फेऱ्या अशा एकूण ११२ फेऱ्या दररोज होतात. राज्यातील अनेक आगारांच्या तसेच परराज्यातील परिवहन मंडळाच्या बसेस संगमनेर स्थानकात येतात. कोरोनामुळे महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके आता पुन्हा गतिमान होऊ लागली आहेत. महामंडळाच्या बससेवेला प्रवासाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे स्थानकात खाद्यपदार्थांची विक्री होते आहे; परंतु पूर्वीसारखा धंदा आता होत नाही. पहिल्यासारख्याच सर्वच बसेस लवकर सुरू झाल्यास आमच्यासाठीदेखील चांगले राहील. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर धंदा चांगला होईल. असे बसस्थानकात खाद्यपदार्थ, पाणी बॉटलची विक्री करणाऱ्यांनी सांगितले.

----------------

इतरही आगाराच्या बसेस स्थानकात

संगमनेर बसस्थानकातून औरंगाबाद, मालेगाव, मुंबई, चाळीसगाव, बारामती, जालना, गोंदवले, अहमदनगर, नाशिक या लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला तसेच काही ग्रामीण फेऱ्या अशा एकूण ११२ फेऱ्या दररोज होतात. इतरही आगाराच्या बसेस संगमनेर बसस्थानकात येतात.

-------------

गेल्या दहा वर्षांपासून संगमनेर बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करतो. लॉकडाऊनमध्ये बसेस बंद असल्याने मोठे हाल झाले. आर्थिक संकट होते. खर्च तर सुरूच होता. मिळेल ते कष्टाचे काम केले. आता बसेस सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांची विक्री करून दोन पैसे मिळतात.

- महेश जाधव, खाद्यपदार्थ विक्रेता, संगमनेर बसस्थानक

------------

काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. कोरोनाकाळात बसेस बंद असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे कामही बंद होते. हाताला काम नसल्याने पर्यायी कामे शोधली. मिळेल ती कष्टाची कामे केली. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून दररोजचा होणारा खर्च कसा तरी भागवत होतो.

- गणेश सातपुते, खाद्यपदार्थ विक्रेता, संगमनेर बसस्थानक

---------------

फोटो नेम : २५संगमनेर बसस्थानक

ओळ : संगमनेर बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करणारे तरुण.