लग्नाआधीच वधू-वर पोलिसांच्या बेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 22:54 IST2020-05-26T22:54:25+5:302020-05-26T22:54:30+5:30
नवरदेव कोपरगावातील असल्याची खोटी माहिती मुलीच्या नातेवाईकांनी तहसीलदारांना दिली होती.

लग्नाआधीच वधू-वर पोलिसांच्या बेडीत
कोपरगाव (जि़ अहमदनगर) : लॉकडाउनमध्येही लग्नाच्या बेडीत अडकण्याची झालेली घाई नवरा-नवरीला थेट पोलिसांच्या बेडीपर्यंत घेऊन गेल्याची घटना मुर्शदपूर (ता़ कोपरगाव) येथे घडली़ हा नवरदेव रेडझोन असलेल्या मुंबईतील असून, नवरी मुर्शदपूर येथील आहे़ मात्र, लग्नासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार नाही, हे गृहित धरुन या नवऱ्याने व त्याच्या नातेवाईकांनी चोरीचुपके लग्नस्थळ गाठले अन् पोलिसांच्या बेडीत अडकले.
नवरदेव कोपरगावातील असल्याची खोटी माहिती मुलीच्या नातेवाईकांनी तहसीलदारांना दिली होती. त्यामुळे या फसवणूक प्रकरणी तलाठी धनंजय गुलाबराव पºहाड यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, नवरदेव आकाश राजू सरोदे व वधू आश्लेषा उत्तम भालेराव यांच्यासह १३ जणांना अटक केली आहे़