राहुरी कृषी विद्यापीठात पहारेकऱ्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:53+5:302021-02-05T06:28:53+5:30

राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी पहाटे ड्युटीवर असलेल्या एका पहारेकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्रकांत देवराम ...

The body of the guard was found at Rahuri Agricultural University | राहुरी कृषी विद्यापीठात पहारेकऱ्याचा मृतदेह आढळला

राहुरी कृषी विद्यापीठात पहारेकऱ्याचा मृतदेह आढळला

राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी पहाटे ड्युटीवर असलेल्या एका पहारेकऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्रकांत देवराम चव्हाण असे या मृत पहारेकऱ्याचे नाव आहे.

गेल्या दहा वर्षांपासून सतत व एकाच जागेवर रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने, चंद्रकांत पवार (वय ३८, रा.खडांबे खुर्द, ता. राहुरी) हे तणावात होते. याच दरम्यान सततची रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने चंद्रकांत यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे चंद्रकांतचा संसार मोडला होता, अशी माहिती चंद्रकांतच्या नातेवाइकांनी दिली.

१ फेब्रुवारी रोजी चंद्रकांत पवार हा नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेला. बी-बियाणे अंतर्गत ‘ड’ विभाग या ठिकाणी त्याच्याबरोबर रामाजी गेणूभाऊ शिंदे हा तरुण ड्युटीवर होता. दोघे आळीपाळीने जागून पहारा देत होते. २ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या दरम्यान चंद्रकांत पवार हा मृतावस्थेत आढळून आला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रामाजी शिंदे याने चंद्रकांत यांच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली. नातेवाइकांनी चंद्रकांत यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

चंद्रकांत पवार यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला. याचा अहवाल त्याच्या शवविच्छेदनानंतर प्राप्त होईल. मात्र, चंद्रकांत यांच्या मृत्यूने खडांबे खुर्द व विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत याच्यापश्चात एक मुलगा, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बऱ्हाटे हे करीत आहेत.

....

चौकशीची मागणी

चंद्रकांत पवार यांच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेबाबत विद्यापीठाचे कुलसचिव यांनी चौकशी करून पवार कुटुंबीयांना न्याय द्यावा. विद्यापीठ प्रशासनाकडून त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी रोहित पाटोळे यांनी केली आहे.

...

Web Title: The body of the guard was found at Rahuri Agricultural University