लोणीत भाजप नेत्यांची मांदियाळी : राधाकृष्ण विखेंचा कधी होणार भाजप प्रवेश ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:33 IST2019-05-09T12:33:33+5:302019-05-09T12:33:46+5:30

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ८७ व्या जयंतीदिनानिमित्त आज लोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात अभिवादन सोहळा पार पडला

BJP leaders in butterfly: Will Radhakrishna Vikhane enter the BJP ever? | लोणीत भाजप नेत्यांची मांदियाळी : राधाकृष्ण विखेंचा कधी होणार भाजप प्रवेश ?

लोणीत भाजप नेत्यांची मांदियाळी : राधाकृष्ण विखेंचा कधी होणार भाजप प्रवेश ?

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ८७ व्या जयंतीदिनानिमित्त आज लोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात अभिवादन सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्यासह भाजप-सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांचे पद्मश्री डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांनी स्वागत केले.
प्रवरा परिवार आणि लोणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांच्या जयंतीदिनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधान आले आहे.

 

Web Title: BJP leaders in butterfly: Will Radhakrishna Vikhane enter the BJP ever?