नगरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न; दोघा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:46 IST2020-05-16T15:46:01+5:302020-05-16T15:46:21+5:30
अहमदनगर शहरातील नगर-पुणे रोड वरील हॉटेल फरहतच्या शेजारी असलेल्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

नगरमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न; दोघा आरोपींना अटक
अहमदनगर: शहरातील नगर-पुणे रोड वरील हॉटेल फरहतच्या शेजारी असलेल्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दोघा चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी ३० एप्रिल रोजी रात्री बँकेच्या शाखेत घुसून आलाराम व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक विजयकुमार देवकरण वाडबुदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात नगर तालुका, कोतवाली, पारनेर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.