Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:43 IST2026-04-10T17:31:20+5:302026-04-10T17:43:27+5:30

Pratibha Chakankar Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्याबरोबरच त्यांच्या बहिणीचे नाव आले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस दिली आहे. 

Ashok Kharat Case: Rupali Chakankar's sister Pratibha Chakankar will be questioned, police issued notice | Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस

भोंदूबाबा अशोक खरात याने केलेल्या कृत्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, नवीन गुन्हे दाखल होत आहेत. अशोक खरातच्या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव आले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली असून, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. 

समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली असून, प्रतिभा चाकणकर यांची चौकशी पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

अशोक खरात यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. हे प्रकरणच समता पतसंस्थेशी संबंधित असल्याचे समोर आले असून, त्यात संशयास्पद खाती आढळून आली आहेत.

प्रतिभा चाकणकर यांची खाती, वारसदार अशोक खरात

समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलीच्याही नावाचे खाते असल्याची माहिती आहे. अशोक खरात हा सावकारीचे काम करून लोकांच्या जमिनी हडपण्याचे काम करत होता. त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता. 

अनेक व्यवहार हे समता व जगदंबा या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेत एकूण ५७ खातेदारांनी १०० खाती उघडलेली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी (वारसदार) म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यांवरुन सुमारे ६० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यात आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यात चाकणकर नावाचेही खातेदार असून, या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाइल नंबर जोडलेला आहे.

Web Title : अशोक खरात मामला: रूपाली चाकणकर की बहन प्रतिभा से होगी पूछताछ।

Web Summary : रूपाली चाकणकर की बहन प्रतिभा चाकणकर को अशोक खरात मामले में समता पतसंस्था में संदिग्ध लेनदेन के लिए पुलिस जांच का सामना करना पड़ेगा। खरात पर वित्तीय अनियमितताओं और जमीन हड़पने के आरोपों के संबंध में नोटिस जारी किया गया है।

Web Title : Ashok Kharat Case: Rupali Chakankar's sister, Pratibha, to be investigated.

Web Summary : Pratibha Chakankar, sister of Rupali Chakankar, faces police inquiry in the Ashok Kharat case regarding suspicious transactions at Samata Patsanstha. A notice has been served, and investigations are underway concerning financial irregularities and land grabbing accusations against Kharat.