Ahmednagar: बायको नांदत नसल्याने सासरच्यांवर हल्ला, मेहुणा, पत्नी आणि आजी सासूची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 12:42 IST2023-09-21T12:40:11+5:302023-09-21T12:42:22+5:30

Ahmednagar Crime News: ऐन गणेशोत्सवात शिर्डी जवळील सावळेविहिर येथे मध्यरात्री झालेल्या तिहेरी हत्याकांडाने संपुर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना पाच तासात जेरबंद केले आहे.

As the wife was not sleeping, the in-laws were attacked, the brother-in-law, wife and grandmother-in-law were killed | Ahmednagar: बायको नांदत नसल्याने सासरच्यांवर हल्ला, मेहुणा, पत्नी आणि आजी सासूची केली हत्या

Ahmednagar: बायको नांदत नसल्याने सासरच्यांवर हल्ला, मेहुणा, पत्नी आणि आजी सासूची केली हत्या

- प्रमोद आहेर
शिर्डी - ऐन गणेशोत्सवात शिर्डी जवळील सावळेविहिर येथे मध्यरात्री झालेल्या तिहेरी हत्याकांडाने संपुर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना पाच तासात जेरबंद केले आहे.

बायको सासरी राहत नसल्याच्या रागातून व कौटुंबिक वादातून या घटनेतील आरोपी सुरेश निकम याने चुलत भावाच्या मदतीने सासुरवाडीवर केलेल्या हल्ल्यात मेव्हणा, बायको व आजी सासूची हत्या केली आहे.

यात रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा), हिराबाई ध्रुपद गायकवाड (आजी सासू) व वर्षा सुरेश निकम (पत्नी) अशी मयताची नावे आहेत. या घटनेत सासू, सासरा व मेव्हनी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी जवळच असलेल्या सावळेविहीर येथे काल मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली, शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: As the wife was not sleeping, the in-laws were attacked, the brother-in-law, wife and grandmother-in-law were killed