साडेपाच हजार कांदा गोण्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:01+5:302020-12-13T04:35:01+5:30
नंबर १ चा कांदा २६०० ते ३५००, नंबर २ चा १५०० ते २५५०, नंबर ३ चा ५०० ते १४५० ...

साडेपाच हजार कांदा गोण्यांची आवक
नंबर १ चा कांदा २६०० ते ३५००, नंबर २ चा १५०० ते २५५०, नंबर ३ चा ५०० ते १४५० व गोल्टी कांदा १६०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. टाकळीभान उपबाजारत ७८० कांदा गोण्यांची आवक झाली होती. तेथे नंबर १ चा कांदा २३०० ते ३३००, नंबर २ चा १३०० ते २२५०, नंबर ३ चा ३०० ते १२५० व गोल्टी कांदा १४०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.
.............................
हातातील पिशवी चोरट्याने लांबविली
श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील बसस्थानकाजवळ केळी घेण्यासाठी थांबलेल्या पती-पत्नीच्या हातातील १४ हजार ५०० रुपये रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने हिसकावून दुचाकीवरून पळून गेल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.
जगन्नाथ गायकवाड व त्याच्या पत्नी सावित्रीबाई गायकवाड (रा. शिंदेवाडी, पढेगाव, ता. श्रीरामपूर) हे श्रीरामपूरच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेत शुक्रवारी सकाळी ११ वाजता खात्यातून पैसे काढण्यासाठी आले होते. १५ हजार रुपये बँकेतून घेतल्यानंतर ते गावाकडे निघाले असता बेलापूर येथे बसस्थानकजवळ मुलांसाठी केळी घेण्यास थांबले असताना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी गायकवाड यांच्या हातातील १५ हजारांची रक्कम असलेली पिशवी हिसकावत दुचाकीवरुन धूम ठोकली. जगन्नाथ मोहमंद गायकवाड यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांत पैशाची बॅग चोरीस गेल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दोघांविरुद्ध दाखल केला आहे.