लोहारे-मिरपूर येथे ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST2021-04-23T04:21:39+5:302021-04-23T04:21:39+5:30
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील आहेत. ऑक्सिजन ...

लोहारे-मिरपूर येथे ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसोची मान्यता
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्नशील आहेत. ऑक्सिजन रिफिलिंग केंद्राचे संचालक भाऊराव जोंधळे, डॉ. संदीप पोकळे, भाऊराव कदम, कृष्णा पोकळे आदी यावेळी उपस्थित होते. महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेर येथे कोरोना आढावा बैठकीत ऑक्सिजन पुरवठादार राम सुरेश जाजू यांना बोलवून याकामी सूचना दिल्या होत्या. अहमदनगर शहरातही तातडीने ऑक्सिजनपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. याचबरोबर तळेगाव भागातील लोहारे-मिरपूर येथे कार्यरत असलेले ऑक्सिजन रिफिलिंग सेंटर काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. कारखान्याचे संचालक थोरात यांनी तांत्रिक अडचणी समजून घेत मंत्रालयीनस्तरावर त्याचा पाठपुरावा करत पेसोकडून तातडीची मंजुरी मिळून दिली. त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन देण्याऐवजी हा ऑक्सिजनपुरवठा शासकीय व खाजगी रुग्णालयांत रुग्णांना पुरविला जाणार आहे.
...................
कोरोना हे मानवावरील संकट आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोरोना उपाययोजनांचा दररोज आढावा घेत असून ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत करण्याकरिता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लोहारे-मिरपूर येथील रिफिलिंग सेंटरमुळे आपल्या परिसरातील शासकीय व खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळणार असून याचा लाभ थेट रुग्णांना मिळणार आहे.
इंद्रजित थोरात, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना