नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:10+5:302021-08-27T04:25:10+5:30
नेवासा : पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी ...

नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत
नेवासा : पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी २५ ऑगस्ट रोजी एकत्रित येत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत शासनाला निकृष्ट दर्जाचे मोबाईल आंदोलनाद्वारे परत केले.
२०१९ मध्ये सेविकांना देण्यात आलेल्या या मोबाईलची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकानी १७ ऑगस्टपासून आपापल्या प्रकल्प कार्यालयात जाऊन मोबाईल परत करण्याचे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले आहे. शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, गर्भवती माता, पोषण आहाराचे वाटप, आदी माहिती भरण्यासाठी करतात. मात्र, या मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्याने हे मोबाईल वारंवार हँग होतात. त्यामुळे या मोबाईलवर सेविकांना काम करणे कठीण होते. मोबाईलचा दर्जा निकृष्ट असल्याने त्यांच्या दुरुस्तीचा खर्च सुमारे ३ ते ८ हजारांपर्यंत होतो. जोपर्यंत चांगल्या दर्जाचे मोबाईल शासन देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी वक्त्यांनी दिला.
260821\img-20210825-wa0033.jpg
?????? ??????????? ???????? ???????? ??????? ???? ?????? ???