राहात्यात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:49 IST2017-10-23T22:49:19+5:302017-10-23T22:49:19+5:30
नयन भगवंत वाघमारे (वय ३९) या तरुणाने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहाता शहरातील विशालनगरमध्ये सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

राहात्यात तरुणाची आत्महत्या
र हाता (जि. अहमदनगर) : येथील नयन भगवंत वाघमारे (वय ३९) या तरुणाने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहाता शहरातील विशालनगरमध्ये सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपूर्वी राहात्या घरातील खोलीचे दार आतून बंद करुन पंख्याला दोरी बांधून नयन याने गळफास घेतला. मयताचे वडील भगवंत वाघमारे यांनी खिडकीच्या फटीतून आत डोकावून पाहिले असता त्यांना मुलगा नयन पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत दिसला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर खोलीचा दरवाजा तोडून लटकलेला मृतदेह खाली घेतला. पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत नयनचे डिप्लोमा इंजिनिअरिंग झाले होते. नोकरी न मिळाल्याने तो घरीच होता. नितीन भगवंत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शरद गायमुखे हे करीत आहे.