अहमदनगरमध्ये मतदानकेंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:21 IST2018-12-10T14:21:37+5:302018-12-10T14:21:47+5:30
अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी जोरदार लाठीमार केला.

अहमदनगरमध्ये मतदानकेंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. पोलिसांच्या अंगावर रंग उधळल्यामुळे हा लाठीमार सांगितल्याचे जात आहे.
मत मोजणी केंद्राबाहेर हजारो लोकांचा समुदाय जमला होता. उमेदवार निवडून येताच कार्यकर्ते जल्लोष करीत होते़ त्याचवेळी एका उमेदवाराच्या निवडीचा जल्लोष सुरु असताना काही पोलिसांच्या अंगावर रंग पडला. त्यामुळे पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. लाठीमार होताच जमावाने मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. या लाठीमारात काहीजण जखमी झाले असून, मत मोजणी केंद्राबाहेर चपलांचा खच पडला होता.