शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar Acid Attack: संतापजनक...! अहिल्यानगर हादरले; शाळेतून निघालेल्या सहावीच्या मुलीवर फेकले ॲसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:28 IST

Ahilyanagar Acid Attack on School Girl: पीडित मुलगी कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील एका खेडेगावात शिक्षण घेते. ती नातेवाईकाच्या घरी राहते. दुपारी ती शाळेतून सायकलवर घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे ती जोरदार किंचाळली. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी तिला गावातील खासगी रुग्णालयात हलविले. 

संगमनेर (जि. अहिल्यानगर) : संगमनेर तालुक्यात सहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात इसमाने ॲसिडसदृश ज्वलनशील पदार्थ फेकला. यात मुलीचा चेहरा व हात गंभीर भाजला आहे. हल्लेखोर फरार झाला आहे.

पीडित मुलगी कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील एका खेडेगावात शिक्षण घेते. ती नातेवाईकाच्या घरी राहते. दुपारी ती शाळेतून सायकलवर घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे ती जोरदार किंचाळली. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी तिला गावातील खासगी रुग्णालयात हलविले. 

शिक्षणासाठी मुलगी राहते नातेवाइकांकडे पीडित मुलीला वडील नाहीत. ती तिच्या आईसह संगमनेर तालुक्यातील एका गावात शिक्षणासाठी आपल्या मामाकडे राहते. तिच्या शाळेपासून मामाचे घर दूर असल्याने ती दररोज सायकलवर शाळेत ये-जा करत होती.  

मुलीची प्रकृती स्थिरमुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. डोळ्यांना कोणतीही इजा झालेली नाही, असे नातेवाईकांनी सांगितले.राज्यमार्गावर भर दुपारी घडली घटना १)     कोल्हार-घोटी राज्यमार्गावर दीड कि.मी. अंतरावर मुलीचे घर आहे. राज्यमार्गापासून पाचशे मीटर अंतरावर ही घटना घडली.२)     राज्यमार्गापासून मुलगी घराकडे जाताना ही घटना घडली.३) राज्यमार्गापासून शाळेचे अंतर ३ कि.मी. आहे.विधानसभेतही उमटले घटनेचे पडसादज्या परिसरात घटना घडली, तेथे सीसीटीव्ही नाहीत. तरीही पोलिसांनी विशेष पथक नेमून आरोपीचा तपास करावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले असून विद्यार्थिनीला मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत या घटनेचा विषय उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून घेतली असून या विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही सभागृहात दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage: Ahilyanagar Shaken as Acid Thrown on Schoolgirl

Web Summary : In Sangamner, a sixth-grade girl was attacked with acid near her school. The assailant fled, leaving the girl with severe burns on her face and hands. She was rushed to a local hospital; her condition is now stable.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीPoliceपोलिसSchoolशाळाhospitalहॉस्पिटल