श्रीरामपुरात बंटी जहागिरदारवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:24 IST2025-12-31T17:23:00+5:302025-12-31T17:24:11+5:30
Ahilyanagar Crime News: श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी श्रीरामपूर शहरात गोळीबार झाला.

श्रीरामपुरात बंटी जहागिरदारवर गोळीबार
श्रीरामपूर ( अहिल्यानगर) : येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी श्रीरामपूर शहरात गोळीबार झाला. यामध्ये जखमी झाल्याने कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कब्रस्तानातून परत येत असताना जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोर पसार झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.