शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालय असून अडचण नसून खोळंबा

By admin | Updated: November 28, 2014 01:14 IST

कुळधरण : कुळधरण येथील मंडल कृषी कार्यालय अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी बंद अवस्थेत असून, तेथील कर्मचारी कर्जत येथील तालुका कार्यालयात बसून मंडळाचा कारभार हाकत आहेत़

कुळधरण : कुळधरण येथील मंडल कृषी कार्यालय अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी बंद अवस्थेत असून, तेथील कर्मचारी कर्जत येथील तालुका कार्यालयात बसून मंडळाचा कारभार हाकत आहेत़ त्यामुळे कुळधरण मंडळातील १३ गावांमधील हजारो शेतकऱ्यांना रोज तालुक्याला मंडळ कृषी अधिकारी व कर्मचारी शोधत फिरण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे कृषी विभागाकडून राबवण्यिात येत असलेल्या विविध योजना माहितच होत नसल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषी पुरक साधने उपलब्ध होत असतात. तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते. शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र कुळधरण मंडल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी या योजनापासून वंचित राहत आहेत.कुळधरण मंडल कृषी कार्यालय हे कर्जत येथे राशीन मार्गावर आहे. त्यामुळे कुळधरण परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून कृषी विषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी कर्जतला जावे लागते़ कर्जतला गेल्यानंतर अधिकारी क्षेत्र भेटी गेल्याचे गोंडस कारण सांगितले जाते़ त्यामुळे शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करुन मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही़ कुळधरण येथील मंडळ कार्यालय २००९ मध्ये स्थलांतरित करुन कर्जत येथे बांधण्यात आले़ मंडळातील अधिकाऱ्यांना मंडळ कार्यक्षेत्रात राहणे बंधनकारक असतानाही थेट कार्यालयाच कर्जतला हलवून कृषी विभागाने शेतकऱ्यांची चेष्टा चालविल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत़ कुळधरण मंडळात सर्वाधिक गावे कुळधरण परिसरातील आहेत़ मात्र, कार्यालय कर्जतला हलविण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे़ कृषी विभागाचा सर्व कारभार कर्जत येथील कार्यालयातून होत असल्याने कुळधरण येथील कृषी विभागाचे कार्यालय धूळखात असून, या कार्यालयाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. विविध कामासाठी नेहमीच तालुक्याच्या ठिकाणी जाणारे मोजकेच लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून वारंवार योजनांचा लाभ घेतात़ मात्र सामान्य शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचितच आहे. (वार्ताहर)