वडगाव तनपुरे येथे कृषी विद्यार्थिनीची शेतीविषयक प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:06+5:302021-08-27T04:25:06+5:30
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञान, पिकांसाठी आवश्यक असणारी सेंद्रिय खते, औषधे व त्यांचा योग्य ...

वडगाव तनपुरे येथे कृषी विद्यार्थिनीची शेतीविषयक प्रात्यक्षिके
एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञान, पिकांसाठी आवश्यक असणारी सेंद्रिय खते, औषधे व त्यांचा योग्य वापर कसा करावा आदी विषयांवर चर्चासत्रे व प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच महिलांसाठी घरच्या घरी खाद्यपदार्थ बनवून त्यांची साठवणूक कशी करावी व त्यांचे जीवनमान कसे वाढवावे याबाबत प्रात्यक्षिके घेण्यात आली. या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू.बी. होले, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. एच.बी. काळभोर, डॉ. एस.एस. खांदवे, प्रा. सी.व्ही. मेमाणे, डॉ. एस.एस. धुमाळ, डॉ. जे.बी. पाटील, डॉ. एस.जे. वाघमारे, डॉ. ए.आर. आहेर, प्रा. ए.एन. रत्नपारखे, प्रा. एस.डी. वाळे, प्रा. विलास साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.