शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युनंतरही ‘ती’ची अवहेलना संपेना

By admin | Updated: September 27, 2014 00:15 IST

भिंगार : स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू झालेल्या विवाहितेचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्येच सोडून पती व सासूने पळ काढल्याच्या घटनेला नऊ दिवस उलटून गेले आहेत़ तरीही अद्याप त्यांचा शोध लागला नाही़

भिंगार : स्टोव्हच्या भडक्याने भाजून मृत्यू झालेल्या विवाहितेचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्येच सोडून पती व सासूने पळ काढल्याच्या घटनेला नऊ दिवस उलटून गेले आहेत़ तरीही अद्याप त्यांचा शोध लागला नाही़ या विवाहितेच्या अन्य नातेवाईकांचाही शोध लागत नसल्याने मृत्युनंतरही या महिलेची अवहेलना सुरुच आहे़पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ६ आॅगस्ट रोजी बुऱ्हाणनगर येथे सोनाली गणेश सोनावणे (वय २०) स्टोव्ह पेटविताना भडका उडाल्याने भाजली होती़ तिला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची कॅम्प पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सोनालीचा जबाब घेतला़ मी स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचे व यात कोणाचाही दोष नसल्याचे पोलिसांना जबाबात सांगितले़ सोनालीचा पती गणेश दिनकर सोनावणे याने दुसऱ्या दिवशी विखे हॉस्पिटल (विळद घाट) येथे तिला उपचारासाठी दाखल केले़ तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तिची सासू रंजना दिनकर सोनावणे हिने सोनालीला सिव्हील हॉस्पिटल येथे १७ सप्टेंबर रोजी दाखल केले़ येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनालीला मृत घोषित केले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला असता सिव्हील हॉस्पिटलमधून पती व सासूने पळ काढला़ ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांचा शोध घेण्यात आला़ परंतु ते सापडले नाहीत़ बुऱ्हाणनगर येथे माहेरच्या नातेवाईकाची चौकशी केली असता सोनालीचा भाऊ संदीप लक्ष्मण भालेराव हा सातपूर एम़ आय़ डी़ सी़ (नाशिक) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी तेथे जाऊन त्याचा शोध घेतला़ मात्र, तोही सापडू शकला नाही़ त्यामुळे सोनालीचा मृतदेह अद्याप सिव्हील हॉस्पिटलमध्येच आहे़ सोनालीचे अन्य कोणी नातेवाईक असल्यास त्यांनी तात्काळ भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे व पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे़ (वार्ताहर)सोनालीचा स्टोव्हच्या भडक्याने मृत्यू झाला़ तिच्या नातेवाईकांच्या शोधासाठी नाशिक व नगर जिल्ह्यात शोध मोहीम राबविली़ मात्र, कोणीही सापडू शकले नाही़ जास्त दिवस मृतदेह ठेवता येणार नाही़ त्यामुळे शनिवारी अंत्यविधी करण्याबाबत विचार सुरु आहे़- गोरखनाथ गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भिंगार कॅम्प