अतिरिक्त बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST2021-08-13T04:24:38+5:302021-08-13T04:24:38+5:30

संगमनेर तालुक्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या यादीत वामनराव इथापे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, दर्शन रोटरी आय ...

Additional bills will be refunded to patients | अतिरिक्त बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळणार

अतिरिक्त बिलांची रक्कम रुग्णांना परत मिळणार

संगमनेर तालुक्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या यादीत वामनराव इथापे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, दर्शन रोटरी आय हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सौ. मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्टचे डेंटल हॉस्पिटल, अमृतवाहिनी रुरल हॉस्पिटल, अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल, सिद्धकला हॉस्पिटल या तालुक्यातील ८ धर्मादाय रुग्णालयांचा समावेश आहे. त्या सर्व रुग्णालयांच्या नावात धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख करण्यासाठी सर्वांना पत्र दिले जाणार आहे. तिथे दुर्बल आणि निर्धन घटकांसाठी राखीव असलेल्या खाटांची माहिती घेतली जाईल. ज्या धर्मादाय रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती त्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या दहा किंवा पूर्ण कोट्यातील सर्व रुग्णांच्या बिलाचे पुनर्लेखापरीक्षण केले जाणार आहे.

Web Title: Additional bills will be refunded to patients