खुनी हल्ल्यातील आरोपीला आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By अण्णा नवथर | Updated: August 24, 2023 12:03 IST2023-08-24T12:03:32+5:302023-08-24T12:03:54+5:30

कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा लावून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. 

accused in the murder case arrested by the ahmednagar police | खुनी हल्ल्यातील आरोपीला आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खुनी हल्ल्यातील आरोपीला आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क,  अहमदनगर:  जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सोहेल फिरोज शेख (वय २६ वर्षे, रा.केडगाव,अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

केडगाव परिसरात राहुल प्रल्हाद शेळके (वय २४ वर्षे रा. केडगाव, अहमदनगर) यांना दोन आरोपींनी धारदार शस्त्राने कानावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा केल्यापासून आरोपी चांद पठाण, सोहेल शेख ,हे दोघे फरार होते. यातील आरोपी सोहेल फिरोज शेख हा केडगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केडगाव भागात सापळा लावून आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. 

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखालीl सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, रविंद्र टकले, मोहन भेटे, नकुल टिपरे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: accused in the murder case arrested by the ahmednagar police