नगर-जामखेड रस्त्यावर अपघात, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 22:21 IST2019-06-20T22:21:35+5:302019-06-20T22:21:54+5:30

नगर-जामखेड रस्त्यावर हॉटेल नंदनवन जवळ रात्री साडे सातच्या सुमारास दुचाकी व अन्य वाहानाच्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

Accident on city-Jamkhed road, one death | नगर-जामखेड रस्त्यावर अपघात, एकाचा मृत्यू

नगर-जामखेड रस्त्यावर अपघात, एकाचा मृत्यू

अहमदनगर - नगर-जामखेड रस्त्यावर हॉटेल नंदनवन जवळ रात्री साडे सातच्या सुमारास दुचाकी व अन्य वाहानाच्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दुसरे वाहन घेऊन चालक पळुन गेला. या बाबत समजलेली माहिती अशी की केळ सांगवी ता. आष्टी येथील मुळरहिवासी व हल्ली नगर येथे पाईपलाईन रोड वरील बडे वस्ती राहत असलेले माथडी कामगार मोहन रतन सापते हे हिरो होंडा वरून (दुचाकी क्रमांक एम एच 16 ए के 6416) नगर कडे जात असतांना जामखेडला जाणाऱ्या वाहनाने त्यांना उडविल्याने ते जागीच ठार झाले. धडक इतकी जोरदार होती की ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजुस फेकले गेले. डोक्याला जबर जखम होऊन मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांनी जागीच प्राण सोडला. 
घटनेची माहिती कळताच पोलिस व 108 रूग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहचले. तो पर्यंत सापते गतप्राण झाले होते. पुढील तपास पोलिस नाईक सोनवणे बी व्ही करत आहेत. रात्री उशीरापर्यत पंचनामा सुरू होता. पळुन गेलेल्या वाहन सीसी कमेरा फुटेजमच्या आधारे शोधु काढले जाईल अशी माहिती सोनवणे यांनी दिली. 

Web Title: Accident on city-Jamkhed road, one death