अहमदनगर-दौड महामार्गावर भीषण अपघात; चौघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 09:23 IST2019-09-26T07:04:59+5:302019-09-26T09:23:25+5:30
नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले.

अहमदनगर-दौड महामार्गावर भीषण अपघात; चौघे जागीच ठार
अहमदनगर : नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले. नगर दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक (एमपी/09-एचएच/8378) व कार (एमएच/04-बिवाय/4857) भीषण अपघात झाला. अपघातात नगर जवळील भिंगारचे तीन तर नगर तालुक्यातील वाळकी येथील एकजण असल्याचे समजते.
श्रीगोंद्याहून नगरकडे येत असताना हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघू चोभे, मणेश भोसले यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.